शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

त्रिशुळाद्वारे उपचार करणारा बाबा

WDWD
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सदरांतर्गत यावेळी एक कडवट सत्य आम्ही आपल्यापुढे आणत आहोत. यावेळीही कहाणी एका बाबाचीच आहे. या बाबाचे नाव आहे बालेलाल शर्मा. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे तो रहातो. या बाबाच्या अंगात म्हणे पीर येतो आणि त्यानंतर हा बाबा त्रिशुळाच्या सहाय्याने चक्क शस्त्रक्रिया करतो. कोणत्याही भक्ताचा त्रास, दुःख, भलेही ते शारीरिक असो वा मानसिक, आपण ते दूर करू शकतो, असा या बाबाचा दावा आहे.

हे ऐकताच आम्ही भोपाळमधील रतीबाडा येथे कूच केले. येथे एक छोटे मंदिर आहे. आम्ही गेलो तेव्हा लोकांची गर्दी जमली होती. बाबा येण्याच्याच मार्गावर होते, अशी माहिती मिळाली आणि थोड्याच वेळात एका सिल्व्हर रंगाच्या इंडिका गाडीचे आगमन झाले. त्यातून बालेलाल शर्मा महाराज उतरले. तोपर्यंत बाबांचा महिमा आमच्यापर्यंत पोहोचला होता.

म्हणून मग आम्ही त्यांना त्यांच्याविषय
WDWD
, त्यांच्या अंगात येणाऱ्या पीराविषयी विचारले. मग बाबांनी सांगितलेली माहिती अगदी एखाद्या सुरस कथेसारखी होती. बाबांच्या अंगात म्हणे त्यांच्या खानदानी पिराचा आत्मा येतो. सुरवातीला त्यांना असे झाले तेव्हा कुटुंबातील इतरांनी त्याकडे लक्षच दिले नाही. त्यानंतर अनेक डॉक्टरांना दाखवले. पण काहीच फरक पडला नाही.

तेव्हा सगळ्यांच्याच लक्षात आलं की बाबेलालवर पीर साहेबांचा आशीर्वाद आहे. पण तरीही वेगवेगळ्या पद्धतीने खरोखरच त्यांच्यात पीराचा आत्मा येतो का याची चाचणी करण्यात आली. मग त्यांच्या अंगात जेव्हा पीरसाहेब आले त्यावेळी त्यांनी चमत्कार करून घरच्यांना मिठाई वाटली.

WDWD
यानंतर मात्र सगळ्यांचीच खात्री पटली. बाबाच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनच वाटत होतं, की तो आम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतोय. मग आम्हीच म्हटलं, बाबा आम्हाला पण मिठाई द्या की. त्यावर बाबाने अगदी राजकारणी व्यक्तीसारखं उत्तर दिलं, पीरसाहेबांची कृपा झाली तर ते येतील आणि त्यांची इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच मिठाई मिळेल.


WDWD
एवढं बोलून झाल्यानंतर बाबा मंदिरात गेले. आत गेल्यानंतर त्यांनी कुर्ता पायजमा उतरवला आणि चक्क मोठी जीन्स घातली. हे पाहिल्यानंतर बाबाचे बिंग सुरवातीलाच फुटले. कारण पीर अंगात आल्यानंतर हा बाबा म्हणे खिळ्याच्या आसनावर बसतो. त्याला काही टोचत नाही म्हणे. कसे टोचणार? जीन्सची जाड पॅंट घातल्यानंतर कसे काही टोचेल?

पण समोरच्या लोकांच्या हे काहीच लक्षात येत नव्हते. कपडे बदलल्यानंतर बाबांचे नाटक सुरू झाले. ते काहीतरी पुटपुटले आणि विचित्र पद्दतीने नाचायला लागले. मग त्यांचे शिष्यही जयजयकार करायला लागले. त्यांनी बाबाला उचलले आणि खिळ्यांच्या आसनावर बसवले. त्यानंतर सुरू झाला लोकांना मुर्ख बनविण्याचा उद्योग.

आमच्यासमोर एक किडनीचा रूग्
WDWD
आला. त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. रोगी पाहून बाबा म्हणाला, माझ्याकडे असलेल्या लिंबूतून गव्हाचे दाणे निघाले तर याचा इलाज होऊ शकतो. त्यानंतर लिंबातून गहू काढण्याचा उद्योग करण्यात आला. हे दाणे म्हणजे मी दिलेले वचन आहे, असे सांगून बाबाने आता या रूग्णाचे त्रिशुळाच्या सहाय्याने ऑपरेशन करण्यात येईल असे सांगितले. मग त्याने एका मुलीला बोलवले.

तिच्या हातात त्रिशुळ दिला आणि तिला त्रिशुळाचे मागचे टोक रूग्णाच्या कंबरेच्या चार इंच आत जाईल, असे घुसविण्यास सांगितले. असे केल्यास रूग्ण बरा होईल असा त्याचा दावा होता. हे कथित ऑपरेशन होण्यापूर्वी रूग्णावर चादर घालण्यात आली. त्यानंतर त्या मुलीने त्रिशुळ त्या रूग्णाच्या कंबरेत घुसविण्याचे नाटक केले. मग बाबाने ऑपरेशन झाल्याचे आणि रूग्णाचा आजारही पळून गेल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये एकही थेंब रक्त वाहिले नाही.

WDWD
पण बाबाच्या या चमत्काराचा लोकांवर मात्र प्रभाव पडल्याचे दिसले. लोक कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करताच त्यावर कसा विश्वास ठेवतात ते दिसतच होते. बाबाला मग आणखी स्फुरण चढले. पुढच्या आठवड्यात म्हणे ब्लेडच्या सहाय्याने एका रूग्णाच्या किडन्या बाहेर काढून त्या स्वच्छ करणार असल्याचे त्याने जाहीर केले. आता या गोष्टी करणे एवढे सोपे असते तर एवढी मोठी हॉस्पिटल्स उभी राहिली असती का? डॉक्टर वगैरे कोर्सची निर्मिती झाली असती का? डॉक्टर होण्यासाठी लोकांनी पैसे खर्च केले असते का?