रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

मंदिर की आत्म्याचे निवासस्थान?

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागा‍‍त आम्ही आपल्याला घेऊन जातोय मध्य प्रदेशातील देवासच्या दुर्गा माता मंदिरात. या म‍ंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. हे मंदिर जागृत आहे असे काही म्हणतात, तर काहींच्या मते मंदिर शापित आहे. या मंदिरात एका महिलेचा आत्मा भटकत असल्याचा दावा काही जण करतात. प्रत्येकांच्या तोंडून वेगवेगळी कथा ऐकायला मिळते.

या देवीची मूर्ती स्थापन करत असतानाचा अनेक अशुभ घटना घडल्याचे स्थानिक रहिवाशी सांगतात. ज्या राजाने या देवीची स्थापना केली त्याच्या मुलीचा या मंदिराच्या परिसरात संशयास्पद मृत्यू झाला होता. राजकुमारीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या सेनापतीने आणि तिच्या प्रियकरानेही मंदिराच्या परिसरातच आत्महत्या केली होती.

WD
या घटनेनंतर हे मंदिर शापित असल्याचे मानले जाऊ लागले. मग या मंदिरातील देवीची मूर्ती राजाने सन्मानाने उज्जैन येथील मोठ्या गणपती म‍ंदिरात नेली. त्या देवीसारखीच एक मूर्ती रिकाम्या जागी बसवली. पण त्यानंतरही अनेक आश्चर्यकारक घटना घडण्याचा सिलसिला सुरूच राहिला.

मंदिरात नेहम‍ी चित्रविचित्र आवाज ऐकायला येतात. तर कधी शुभ्र साडी नेसलेली महिला फिरताना दिसून येते, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. म्हणूनच दिवस मावळल्यानंतर लोक या मंदिराकडे जाण्याचे टाळतात.

अर्थात या सार्‍या कल्पित कथांना कोणताही पुरावा नाही. पण गावकर्‍यांचा यावर ठाम विश्वास आहे. म्हणूनच की काय कोणीही या मंदिरात फारसे जात नाही. थोडे फार लोक आले तरी दिवस मावळल्यानंतर इथे थांबायचे धाडस कुणीही करत नाही. या मंदिराविषयी आपल्याला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....