शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

देवीच्या मूर्तीतून जेव्हा 'अमृत' वाहते...

WDWD
श्रद्धा-अंधश्रद्धा या मालिकेत भागात आज आम्ही पाण्याचा 'दैवी' चमत्कार दाखविणार आहोत. मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यापासून आठ किलोमीटरवर करेडी नावाच्या गावात तेथील देवीच्या तोंडातून एकसारखे पाणी पाझरत आहे.
गावकर्‍यांच्या मते हे निव्वळ पाणी नसून, अमृत आहे.

WDWD
यासंदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही करेडी गावात पोहोचलो. तेथे सरपंच इंदरसिंह यांची भेट घेतली. त्यांनी देवीची ही मूर्ती महाभारत काळातील असल्याची शक्यता वर्तविली. ही मूर्ती कर्णाचे आराध्य दैवत कर्णावतीची आहे. कर्णावती दानशूर कर्णाला रोज शंभर मण सोने द्यायची, हे सोने कर्ण प्रजेच्या कल्याणासाठी दान देत, असे अशीही माहिती त्यांनी दिली.

WDWD
उज्जैनचा राजा विक्रमादित्य हा देखील कर्णावतीचा भक्त होता. या मंदिराला गावाच्या नावाने म्हणजेच करेडी मातेचे मंदिर या नावाने ओळखले जाते. चंदरसिंग मास्टर या तेथील रहिवाशाने सांगितले, की काही दिवसांपूर्वीच देवीच्या तोंडातून अचानक पाणी पाझरायला लागले. हे पाणी मूर्तीला स्नान घालताना छिद्रात भरले असेल असे वाटून आम्ही साफ केले. पण बर्‍याचदा साफ केल्यानंतरही पाणी पाझरणे सुरूच होते. यामुळे हे पाणी साधे नसून देवीचा प्रसाद असल्याची आमची खात्री पटली.

देवीच्या मूर्तीतून पाणी पाझरत असल्याचे वृत्त वार्‍यासारखे गावभर पसरताच हे दृश्य पाहण्यासाठी गावकर्‍यांनी एकच गर्दी केली. हे पाणी अमृत असून ते प्यायल्याने आजार बरे होतात, अशी गावकर्‍यांची श्रद्धा बसली.

WDWD
मंदिरातील मूर्ती दगडाची असून तिच्या खांद्याजवळ छिद्र आहे. या छिद्रात आपोआपच पाणी भरले जाते. तेव्हापासून आजपर्यंत पाणी पाझरणे सुरूच आहे. मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेले एक भाविक पं. सुरेंद्र मेहता यांनी सांगितले, की देवीची मूर्तीच नव्हे तर हे मंदिरही स्वयंभू आहे. गावात बर्‍याच प्राचीन मंदिरांचे अवशेष जमिनीत गाडले गेले आहेत. येथे कोणत्याही कारणासाठी खोदकाम होते, त्यावेळी प्राचीन मूर्तींचे अवशेष सापडतात. पण पुरातत्त्व विभाग याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप त्यांनी केला.

देवीच्या मूर्तीतून निघणारे पाणी म्हणजे देवीचा चमत्कार असल्याचे भाविकांचे मत आहे. पण हा दैवी चमत्कार नसून
भूगर्भीय चमत्कार असल्याचे काहींचे मत आहे. देवीची मूर्ती बरीच जुनी असून जमिनीत धसलेली आहे. त्यामुळे पाणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा दैवी चमत्कार आहे की विज्ञान, याविषयी तुम्हाला काय वाटते?

फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा....