शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 मे 2017 (12:05 IST)

दहा रुपयांसह सर्वच नाणी चलनात कायम – आरबीआय

दहा रुपयांची नाणी बंद होणार, अशी काही दिवसांपासून अफवांना पसरल्याने नागरिकांमध्येही मोठी चलबिचल सुरू झाली होती. एवढेच नाही तर बऱ्याच व्यापाऱ्यांकडूनही नाणी स्वीकारली जात नव्हती. मात्र आता, रिझर्व्ह बॅंकेनेच दहा रुपयांच्या नाण्यासह सर्वच नाणी चलनात कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ते व्यापारी अन्‌ बॅंकांनी स्वीकारावीत, अशा सूचनाही दिल्या आहेत.
 
सोशल मीडियावर दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र नाणी बंद करण्याचा कोणताही निर्णय नसल्याने ते चलनात कायम राहतील, असे बॅंकेने स्पष्ट केले आहे.