1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (09:53 IST)

विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ

An increase in the cost of unallocated domestic cylinders
पुन्हा एकदा गॅस कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे गृहिणींना सिलिंडर घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या (१४.२ किलो) बाजार भावात ७६.५ रुपायांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो)च्या बाजार भावात ११९ रुपयांची वाढ केली आहे. सदरचे वाढलेले दर लागू होणार आहेत. सलग तिसऱ्या महिन्यात हे दरवाढ झाले आहेत. 
 
राजधानी दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी आता ६८१ रुपये प्रतिसिलिंडर मोजावे लागणार असून मुंबईत ६५१ रुपये प्रतिसिलिंडरची किंमत झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरसाठी दिल्लीत दुकानदारांना तब्बल १२०४ रुपये द्यावे लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात याच सिलिंडरचे दर १०८५ रुपये होते. आता पाच किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे.