गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 16 जानेवारी 2020 (17:00 IST)

अर्थसंकल्पाच्या दिवशीच बँक कर्मचार्‍यांचा संप

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. 8 जानेवारीच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्यानंतर आता युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसाच्या राष्ट्रीय संपाची हाक दिली आहे. येत्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे लाखो कर्मचारी संपावर जाणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून याचदिवशी सरकारी बँकांचा संप असल्याने विलक्षण योगायोग ठरणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहतील.
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 1 फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र बजेटच दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्ता आहे. इंडियन बँक असोसिएशनसोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात  चर्चा फिस्कटल्याने युनायटेडफोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या नेतृत्व करणार नऊ संघटनांचे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्व करते.