रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 21 डिसेंबर 2020 (11:15 IST)

सोने आयातीत 40 टक्क्यांची घसरण

भारत सोच्याचा सर्वात मोठा आयात देश आहे. कोरोनामुळे सोन्याच्या आयातीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. चालू वित्तीय वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची झाली असून ती 12.3 अब्ज डॉलरवर आली आहे.
 
सोने आयातीचा परिणाम देशाच्या चालू खात्याच्या तुटीवर पडतो. वाणिज्य मंत्रालयाच्या 2019-20 वर्षाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारतात 20.6 अब्ज डॉलर इतक्या किमतीचे सोने आयात करण्यात आले होते. त्यात आता 40 टक्क्यांची घट होऊन ते 12.3 अब्ज  डॉलरवर आले आहे. चांदीच्या आयातीतही एप्रिल ते नोव्हेंबर यादरम्यान 65.7 टक्क्यांची  घसरण झाली असून ती 75.2 करोड डॉलर इतकी झाली.