मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (12:50 IST)

वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खुशखबर, पैसे वाचतील

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्या ऑटोमोबाइल सेक्टरसाठी विशेष म्हणजे सक्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली आहे. यामुळे आता खासगी वाहनं 20 वर्षांनी तर व्यवसायिक वाहनं 15 वर्षांनी सक्रॅप केली जातील. 
 
अशात वाहन क्षेत्रातला दिलासा मिळण्याचे संकेत दिसून येत आहे. याने नवीन गाड्यांची मागणी वाढल्यानं वाहन निर्मिती क्षेत्राला गती मिळेल. यामुळे वाहनांच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुन्या वाहनांमुळे प्रदूषण 25 टक्क्यांनी कमी होईल. शिवाय स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे व्यवसायाला चालना मिळेल.