मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2017 (17:23 IST)

पर्यावरणपूरक घरांसाठी गृह कर्जाच्या व्याजदरात सूट

केंद्र सरकार पर्यावरण गृह संकुलांच्या उभारणीसाठी गृह कर्जावरील व्याजदरात सूट देणार आहे. यासोबतच नोंदणी शुल्कातदेखील केंद्र सरकारकडून सवलत दिला जाणार आहे. बदलत्या वातावरणाशी सामना करण्याची क्षमता असलेल्या गृह संकुलांच्या उभारणीवर आता केंद्र सरकारकडून लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पर्यावरणातील बदल विचारात घेऊन केंद्र सरकारकडून ‘ग्रीन होम्स’च्या निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करुन बांधण्यात आलेल्या घरांना ‘ग्रीन हाऊस’ म्हटले जाते. या घरांमध्ये पर्यावरणाचा विचार करुन ऊर्जा, जल संसाधने आणि बांधकाम साहित्याचा वापर केला जातो. ‘ग्रीन हाऊस’ पूर्णपणे पर्यावरणस्नेही असतात. या घरांच्या उभारणीला चालना देणारी पावले सरकारकडून उचलण्यात येणार आहेत. त्यासाठी नवे नियम आणि कायद्यांमध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत.