श्री हर्ष भारवानी, जेटकिंग इन्फोट्रेनचे सीईओ आणि एमडी
ब्लॉकचेन हा वितरित डेटाबेस किंवा लेजर आहे जो संगणक नेटवर्कच्या नोड्समध्ये सामायिक केला जातो. यामध्ये माहिती क्रिप्टोग्राफीद्वारे जोडलेल्या ब्लॉक्समध्ये संग्रहित केली जाते.
जसजसा नवीन डेटा येतो तो नवीन नवीन ब्लॉकमध्ये प्रविष्ट केला जातो आणि हा डेटा कालक्रमानुसार व्यवस्थापित केला जातो.
अशाप्रकारे, ब्लॉकचेन पीअर टू पीअर ट्रान्झॅक्शन्समध्ये अत्यंत उच्च पातळीचा विश्वास निर्माण करते ज्यासाठी कोणत्याही मध्यस्त व्यक्तीला व्यवहारावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता नसते.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे
पारदर्शकता: हे व्यवहार हिस्टरी पारदर्शक बनवते कारण नेटवर्कमधील प्रत्येक नोडमध्ये व्यवहाराची प्रत असते. व्यवहारातील कोणतेही बदल इतर नोड्सना दृश्यमान असतात.
खर्चात कपात: ब्लॉकचेनला तृतीय पक्षाची आवश्यकता नसल्यामुळे, ते व्यवसायांसाठी खर्च कमी करते आणि इतर भागीदाराला विश्वास देखील प्रदान करते.
CBDC लाँच करण्यात ब्लॉकचेनची मदत
ब्लॉकचेन ही DLT (distributed ledger technology) वितरित खातेवही तंत्रज्ञान प्रणाली आहे जी डिजिटल व्यवहार डेटा रेकॉर्ड करते. हे डिजिटल रुपयाच्या अंतिम वापरकर्त्यांमधील प्रक्रिया आणि पेमेंट सेटलमेंटसाठी CBDC चा वापर सुलभ करेल. शिवाय, ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरल्याने डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेण्यात आणि CBDC वापरकर्त्याची गोपनीयता सुरक्षित करण्यात मदत होईल.
हे आरबीआय आणि इतर वित्तीय संस्थांना ऑनलाइन केलेल्या व्यवहाराच्या इतिहासाची एक प्रत देखील अनुमती देईल. शिवाय, व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील. ऑपरेशन्स आणि ट्रान्झॅक्शन्सचा खर्च कमी करण्यासाठी बँकासारख्या मध्यस्थांना काढून टाकून ब्लॉकचेन वापरकर्त्यांना मदत करेल. क्रिप्टोकरन्सीशी निगडित जोखीम कमी करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. तसेच, यामुळे आर्थिक परिसंस्थेत स्थिरता येईल.
CBDC चा वापर देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला नेहमीच्या चलनापेक्षा कितीतरी पटीने अधिक चालना देईल. अनेक देश या डिजिटल चलनाचा शोध घेत आहेत आणि ते सामान्य चलन म्हणून वापरण्यासाठी नियम बनवत आहेत. CBDC चे नियमन आणि व्यवहार करताना ब्लॉकचेन विविध वित्तीय संस्थांमधील पेमेंटची सुरक्षितता वाढवेल. तसेच, यामुळे डिजिटल फसवणुकीचा धोका कमी होईल. हे स्वयंचलित प्रमाणीकरण यंत्रणेसह टोकन-आधारित खाते प्रणाली प्रदान करेल.
CBDCs प्रामुख्याने नियमित रोख पेमेंटच्या जागी किरकोळ (रिटेल ) पेमेंटवर लक्ष केंद्रित करतात. तर दुसरीकडे, ते आंतरबँक सेटलमेंटसाठी पायाभूत सुविधा देखील सुलभ करेल.
त्यामुळे, ब्लॉकचेन-आधारित CBDC विद्यमान पेमेंट प्रणाली आणि व्यवहार प्रणालीतील अडथळे दूर करेल. हे डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करेल. परंतु CBDC हा केंद्रीकृत किंवा विकेंद्रित डेटाबेस असू शकतो की नाही हे अद्याप ठरलेले नाही. पुढे, अधिका-यांनी अस म्हटलं आहे कि की CBDCs वापरल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन होईल आणि तिच्या वाढीस मदत होईल. हे डिजिटल परिवर्तनाचे नवे युग असणार आहे.
Edited by :Ganesh Sakpal
Published By -Smita Joshi