शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (15:50 IST)

आयकर विभागाचे छापे : जया टीव्ही कार्यालयावर छापा

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी  जया टीव्ही आणि डॉ नमाधु एमजीआर  यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली आहे.

टॅक्स चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. हे चॅनल जयललिता यांनी सुरु केलं होतं. या चॅनलचा कारभार अण्णाद्रमुक नेता वीके शशिकला यांच्या परिवाराकडे आहे. भ्रष्टाचार प्रकरणी शशिकला कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यांचा भाचा विवेक जयरमन याच्याकडे सध्या चॅनलची कमान आहे.