शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

IRCTC ची सुविधा, ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने प्रवाशांसाठी नवा पर्याय आणला आहे.  यात ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा आणली आहे. यामुळे रेल्वेचं तिकीट बूक करुन नंतर पैसे देता येतील.
 
‘बाय नाऊ, पे लॅटर’मुळे तिकीट बूक करताना अडथळा ठरणाऱ्या मोठ्या पेमेंट प्रोसेसपासून सुट्टी मिळेल. ई-पे लॅटरच्या सहयोगाने IRCTC ने ही सुविधा आणली आहे. तिकीट बूक केल्यानंतर 14 दिवसात कधीही पेमेंट करता येईल. यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावं लागेल. ‘बाय नाऊ, पे लॅटर’ सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅनची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ज्यानंतर तुम्हाला तिकीट बूक करता येईल.