गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2024 (09:50 IST)

बिझनेस वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात! काय आहे प्रकरण?

SEBI
बेकायदेशीर ट्रेडिंग करण्याच्या कारणामुळे बाजार नियामक सेबीनं एक महत्त्वाचा निर्णय घेत एका बिझनेस वाहिनीच्या १५ गेस्ट एक्सपर्ट्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यासोबतच सेबीनं आपल्या आदेशात या वाहिनीवर येणाऱ्या काही एक्सपर्ट्सना बेकायदेशीर फायद्यांसाठी ७.४१ कोटी रुपये भरण्यास सांगितलंय.
 
काय आहे प्रकरण?
सेबीच्या म्हणण्यानुसार, १ फेब्रुवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत वाहिनीवर दिसणाऱ्या १५ गेस्ट एक्सपर्ट्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील काही जण थेट बेकायदेशीर ट्रेडमध्ये सामील होते. सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय की, त्यापैकी काहींना पुढील आदेश येईपर्यंत बाजारात ट्रेडिंग करण्यासही मनाई करण्यात आलीये.
 
सेबीने ज्यांच्यावर कारवाई केली आहे त्यात सिमी भौमिक, मुदित गोयल, हिमांशू गुप्ता, आशिष केळकर, किरण जाधव, रामावतार लालचंद चोटिया, एसएआर सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अजय कुमार रमाकांत शर्मा, रुपेश कुमार माटोलिया, नितीन छलानी, कन्ह्या ट्रेडिंग कंपनी, मनन शेअरकॉम प्रायव्हेट लिमिटेड, एसएआर कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, पार्थ सारथी धर आणि निर्मल कुमार सोनी यांचा समावेश आहे.
 
नियमांचं उल्लंघन तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांवरून असं दिसून आलं की गेस्ट एक्सपर्ट्सनं वाहिनीवर शिफारशी प्रसारित होण्यापूर्वी त्यांच्या शिफारशींसंबंधीची आगाऊ माहिती प्रॉफिट एक्सपर्ट्ससोबत शेअर केली होती, अशी माहिती सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी दिली.
 
माहिती मिळाल्यानंतर प्रॉफिट कमावलेल्या शेअर्सनं पोझिशन घेतली आणि वाहिनीवर रेकमेंडेशन प्रसारित झाल्यानंतर पोझिशन्स लिक्विडिडेट केल्या. नंतर प्रॉफिट पूर्वीच्या समजूतीनुसार नफा गेस्ट एक्सपर्ट्ससोबत वाटून घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Edited by -Ratnadeep Ranshoor