1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (10:51 IST)

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ

अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किमतीत 2.94 रुपयांची वाढ केली. त्यामुळे सिलिंडरवरच्या करामुळे या किमती वाढल्या असून, आधार मूल्यातही बदल होणार आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरचे किंमत जूनपासून आतापर्यंत सहाव्यांदा वाढली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या सिलिंडरच्या किमतीत 14.13 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
 
अनुदानित प्रति एलजीपी सिलिंडरचा भाव बुधवारी मध्यरात्रीपासून वाढून 502.40 रुपयांवरून 505.34 रुपयांवर पोहोचला आहे. तर विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ होऊन ती प्रति सिलिंडर 880 रुपयांवर गेली आहे. जागतिक किमतीतील वाढ आणि रुपयाची बिघडत असलेल्या स्थितीमुळे विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. तर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना जीएसटीमुळे 2.94 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.