मोबाइल इंटरनेट 1 डिसेंबरपासून महाग
एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने लवकरच आपला मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केल्याने मोबाइल इंटरनेट सेवा महागणार आहे. भारतात इंटरनेट वापरणार्या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे.
जगभरातील चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाइल डेटा सेवा भारतात मिळत आहे. भारतीय बाजारात एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाची सर्वात जास्त भागीदारी आहे. दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसर्या तिाहीत 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुप्रीम कोर्टाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना आदेश दिले होते की, टेलिकॉम कंपन्यांना 90 हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. यानंतर व्होडाफोनने नुकतेच सांगितले की, मोबाइल डेटा आधारित सेवेला वाढती मागणी असूनही भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो. व्होडाफोन आयडिया 1 डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे.
एअरटेलकडूनही याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन दर किती असणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने याची घोषणा केली आहे.