शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (15:42 IST)

काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात

काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे.मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.
 
अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी गेल्या शनिवारीच १ लाख टन कांदा आयात करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार एमएमटीसीनं ४ हजार टन काद्यांच्या खरेदीसाठी याआधीच निविदा मागवल्या आहेत.मात्र याचा परिणाम देशातील शेतकरी वर्गावर होण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे शेतकरी नाराज होतील सोबतच त्यांच्या मनात सरकारबद्दल रोष निर्माण होईल. यामुळे हा कांदा आल्यास आणि देशातील कांदा भाव जर पडले ते भाजपला मोठा फटका बसणार आहे.