रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

तडजोरीनंतर कांदा लिलाव सुरु

लासलगाव बाजार समितीतमध्ये गेल्या २० एप्रिलपासून बंद असलेले कांदा लिलाव सोमवारपासून अखेर सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाचे लिलाव झाल्यानंतर रोख अथवा राष्ट्रीयकृत बँकेचे धनादेश देण्याच्या अटीवर लिलाव हे पूर्वरत झाले आहेत. 
 
याआधी  कांदा विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मालाची चुकवती रोख अथवा एनईएफटी  द्वारे करावे अशी भूमिका लासलगाव शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार बाजार समितीने घेऊन जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये रोख स्वरुपात सुरु असलेल्या व्यवहाराच्या धर्तीवर  लासलगाव मध्ये सुद्धा रोखीने चुकवती करावी या मागणीला वरून लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद होते.लिलाव सुरु झाल्यामुळे शेतकरी वर्गासह,स्थानिक बाजारपेठेत उत्साह दिसून आला.