सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (10:02 IST)

Petrol-Diesel Price Today: आजचे पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर काय आहेत, जाणून घ्या

petrol
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीतून मिळालेला दिलासा कायम आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मागील वेळी 22 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते, तेव्हापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. तर डब्‍ल्‍यूटीआई, क्रूडची किंमत बुधवारी प्रति बॅरल $104.2 वर पोहोचली. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 107.1 वर पोहोचली.
 
बुधवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत फक्त 89.62 रुपये आहे.
 
मुंबई  शहरात बुधवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. 
तर, बृहन्मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.49 रुपये आणि डिझेलचा दर 94.44 रुपये प्रति लिटर आहे. 
आज पुण्यात पेट्रोलचा दर 105.99 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 92.51 रुपये प्रतिलिटर आहे. 
नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.14 रुपये तर डिझेलचा दर 92.66 रुपये प्रतिलिटर आहे. 
नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.58 रुपये प्रतिलिटर आहे. 
कोल्हापुरात पेट्रोल 106.68 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 93.20 रुपये प्रतिलिटर आहे.