शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पेट्रोलपंपांना रविवारी सुट्टी, रोज 9 ते 6 वेळेत पेट्रोलपंप सुरु

येत्या रविवारपासून पेट्रोलपंपांना रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल, तर सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच पेट्रोलपंप चालू राहतील, असा इशारा पेट्रोलपंप चालकांनी दिला आहे.

पंप चालवण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा आणि त्यांना दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारने अपूर्वाचंद्रा कमिटीद्वारे तेल कंपन्यांना दिले होते. मात्र त्याचं गेल्या चार वर्षांपासून पालन करण्यात आलेलं नाही. अनेकदा पत्रव्यवहार करुनही तेल कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही असा आरोप पेट्रोलपंप चालक संघटनांनी केला आहे.