ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नवीन नियम

Last Modified रविवार, 26 जुलै 2020 (19:37 IST)
केंद्र सरकारने २० जुलै रोजी ग्राहकांसाठी नवीन कायदा लागू केला आहे. या नव्या कायद्यात ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ई-कॉमर्स कंपन्याही या कायद्याच्या कक्षेत आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित नवीन नियम आता सूचित केले आहेत. या नियमांनुसार वस्तूंच्या विक्रीचा मार्ग बदलला आहे.
या नवीन नियमात, विक्रेत्यास वस्तू कोणत्या देशात बनवल्या आहेत हे सांगावं लागेल. हा नियम भारतात किंवा परदेशात नोंदणीकृत असलेल्या पण भारतीय ग्राहकांना वस्तू व सेवा देत असलेल्या सर्व विक्रेत्यांना लागू होईल. नवीन नियमांनुसार ई-कॉमर्स कंपन्यांना इतर शुल्कासह विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण किंमतीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यासह, वस्तूची कालावधी समाप्ती तारीख एक्सपायरी तारीख देखील सांगावी लागणार आहे.
या व्यतिरिक्त ज्या देशात वस्तू तयार करण्यात आल्या आहेत, त्याची देखील प्रमुखपणे माहिती द्यावी लागेल जेणेकरुन ग्राहक ती माहिती किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण माहितीसह निर्णय घेऊ शकतील. ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून वस्तू व सेवांची विक्री करण्याची ऑफर देणाऱ्या विक्रेत्यांनी ही माहिती ई-कॉमर्स कंपनीला दिली पाहिजे जेणेकरून ती आपल्या वेबसाइटवर स्पष्टपणे दर्शविली जाऊ शकेल.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कोण आहे गॅंगस्टर रवी पुजारी, तो अफ्रिकेत कोठे लपला होता?

कोण आहे गॅंगस्टर रवी पुजारी, तो अफ्रिकेत कोठे लपला होता?
गेली 25 वर्षं तो मुंबई पोलिसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' लिस्टमध्ये होता. त्याला पकडण्याचे अनेक ...

चीननं खरंच 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं?

चीननं खरंच 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं?
चीनने 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ...

पश्चिम बंगाल निवडणूकः मोदी, ममता की ओवेसी? मुस्लीम मतदार ...

पश्चिम बंगाल निवडणूकः मोदी, ममता की ओवेसी? मुस्लीम मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार?
पश्चिम बंगालचे राजकारण मुस्लीम मतदारांना दुखावून करता येणार नाही.

आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अशी ...

आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अशी ढासळली, कोरोनाचा मोठा फटका
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे

सचिन वझे यांची मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या ...

सचिन वझे यांची मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात भूमिका काय?
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या ...