मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 25 मार्च 2022 (16:31 IST)

ऍक्टिव्हाची धुमाकूळ विक्री

गेल्या काही वर्षांमध्ये देशात स्कूटीची विक्री प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे दिसत आहे. स्कूटी सेगमेंटमध्ये अनेकविध कंपन्यांनी आपली विविध प्रकारची मॉडेल बाजारात सादर केली आहेत. मात्र, Honda Activa ने या सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या विक्रीनुसार, सर्व स्पर्धकांना मात देत होंडा अ‍ॅक्टिव्हा क्रमांक १ वर कायम आहे.
  
होंडाची सर्वात पॉप्यूलर स्कूटर होंडा अ‍ॅक्टिवा 125 वर जबरदस्त ऑफर आणली आहे. या स्कूटरच्या खरेदीवर तुम्हाला  5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. तसेच तुम्ही या स्कूटरला फक्त 3 हजार 999 रुपयाच्या डाउनपेमेंटवर खरेदी करू शकता.  ग्राहकांना निवडक डेबिट कार्डद्वारे EMI वर स्कूटरच्या खरेदीवर या ऑफरचा लाभ मिळेल. कंपनी किमान 30,000 रुपयांच्या व्यवहारांवर 5 टक्के कॅशबॅक देईल म्हणजेच 5,000 रुपयांपर्यंत ऑफर मिळेल.