मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (13:02 IST)

Gold-Silver Price Today: सोने-चांदी दरात घसरण, आजचा भाव जाणून घ्या

रशिया युक्रेन युद्धामुळे भारतात सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सततच्या चढ उतारामुळे आज सोन्या -चांदीचा भाव उतारला आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 8 रुपयांनी कमी होऊन प्रतिग्रॅम 51,371 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव 78 रुपयांनी कमी होऊन वायदा भाव 67,614 रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला आहे. रशिया युक्रेन युद्द्धा मुळे भारतात सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. हे युद्द्ध संपल्यावर सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता विश्लेषकांनी दर्शविली आहे.