शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (15:07 IST)

टाटाची सर्वात छोटी कार नॅनोचंही उत्पादन कंपनीकडून थांबवलं

टाटा कंपनीने इंडिका, इंडिगो या आपल्या दोन कारचं उत्पादन थांबवलं आहे. सामान्य लोकांची असलेली टाटाची सर्वात छोटी कार नॅनोचंही उत्पादन कंपनीकडून थांबवलं जाणार आहे. काही प्रमाणात कंपनीकडून गाडीचं उत्पादन सुरू आहे, पण गाडीची विक्री खूप कमी झाली आहे. वर्ष २००९ मध्ये टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांच्या स्वप्नातला प्रोजेक्ट म्हणून लॉन्च झालेली नॅनो कार होती, मात्र ग्राहकांच्या पसंतीस हवी तशी उतरत नाहीये.
 
पूर्ण देशात २०१८ मध्ये या कारच्या केवळ 1,851 युनिट्सची विक्री झाली, हा तोटा लक्षात घेऊन कंपनीकडून लवकरच या गाडीचं उत्पादन बंद करणार आहे. जेव्हा ही कार बाजारात आली तेव्हा वर्ष २०१२ मध्ये सर्वाधिक म्हणजे ७४,५२४ गाड्यांची विक्री होती. २०१६ मध्ये आणि २१,०१२ गाड्यांची विक्री झाली. २०१७ मध्ये केवळ ७,५९१ आणि २०१८ मध्ये केवळ १८५१ गाड्यांची विक्री झाली आहे.२०१५ मध्ये कंपनीने या कारचं GenX व्हर्जन लॉन्च केलं होतं. यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली होती. पण तरीही या गाडीची विक्री वाढली नाही. अखेर आता या गाडीचं उत्पादन बंद करण्याचं कंपनीने ठरवलं आहे. सामान्य लोकांनी दुचाकीवर चार चार लोक बसवून प्रवास करू नये यासाठी रतन टाटा यांनी ही कार बाजारत आणली होती.