शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (11:24 IST)

धक्बाकादायक बाहेर नाही तर अधिकृत एजन्सीच्या मध्येच चोरला जातोय गॅस, टाकी आता मोजून घ्या

कल्याण येथे सर्वसामान्य माणसाला धक्का देणारी घटना चोरी उघडकीस आली आहे. यामध्ये भारत गॅसच्या एका एजन्सीवर छापा टाकत गॅस चोरीचा एक प्रकार नुकतंच पोलिसांनी उघडकीस केला आहे. या घटनेत मुंबई येथील कल्याणमधील महात्मा फुले परिसरातील पोलिसांनी हा प्रकार  उघड केला असून, 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 3 जणांना अटक केली आहे.
 
कल्याण पश्चिमेतील भानुनगर परिसरात भारत गॅसची एक एजन्सी असून, घरगुती गॅस सिलेंडरमधून कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरून चोरी केली जाते अशी गुप्त माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिस निरीक्षक संभाजी जाधव, एपीआय संजय डामरे यांच्या पथकाने गॅस एजन्सीवर त्वरित छापा टाकला आणि घरगुती गॅस सिलेंडरचे वजन केले, त्यावेळी त्यातील प्रत्येक सिलेंडरमध्ये 1 ते 2 किलो गॅस कमी आढळून आला. गॅस चोरीचा हा सर्व प्रकार एजन्सीमध्ये सुरु होता आणि तो उघड झाला. या प्रकरणी रमाकांत पस्टे, रमेश गुरव, दिनेश शेरखाने या एजन्सीचे दोन मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. तर रोहित सूचक आणि उमेश बनसोडे या इतर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.