अवघ्या काही वेळात रेल्वेचे बुकिंग फुल्ल
रेल्वे मंत्रालयाने १ जूनपासून देशातील विविध मार्गावर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुकिंग सुरू होताच सकाळी ११ वाजेपर्यंत २० जूनपर्यंत गाड्या फुल्ल झाल्या. कर्नाटक सरकारने इतर राज्यातील मजुरांना आपल्या राज्यात येण्यास मनाई केल्याने मुंबई ते बंगळूर ट्रेनचे टिकीट उपलब्ध होते.
या गाड्यांना एसी, नॉन एसी आणि जनरल सेकंड क्लासचे कोच असणार असून त्याचे तिकिटदर देखील त्याप्रमाणेच असणार आहेत. प्रवासी गाड्यांचे ३० दिवस आधी आरक्षण करु शकतात. या गाड्यांमध्ये दिव्यांग आणि वैद्यकीय प्रमाणपत्र असणाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे. आरक्षित तिकिट असलेले प्रवासीच या गाड्यांमधून प्रवास करु शकतात. गाड्यांमध्ये प्रवाशांना अन्नपदार्थ, ब्लॅंकेट वगैरे पुरविण्यात येणार नाही. या गाड्यांमध्ये मुंबईतून सुटणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या वेळापत्रकानुसारच धावणार असून त्यांचे थांबेही पूर्वीप्रमाणेच असणार आहेत.