रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 27 एप्रिल 2017 (12:10 IST)

आता 2500 रूपयात हवाई प्रवास, जाणून घ्या स्कीम

आजपासून सामान्य जनतेला स्वस्त उड्डाणाची सवलत मिळाली आहे. आता केवळ 2500 रुपये खर्च करून एका तासाची उड्डाणाचा आनंद घेता येऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण स्कीम अंतर्गत शिमला ते दिल्ली यात पहिल्या फ्लाईटचे उद्घाटन केले. मोदी सरकारने उड्डाणाची सुरुवात ऑक्टोबर 2016 मध्ये रीजनल कनेक्टिविटी स्कीमच्या अंतर्गत केली होती. या स्कीमचा उद्देश्य विमान सेवा लहान शहरांपर्यंत पोहचवणे आणि भाडे कमी ठेवून लहान शहरातील लोकांना योजनेचा अधिक फायदा मिळाला असा आहे.
 
या योजनातंर्गत एक तासाच्या विमान प्रवासात किंवा 500 किमीच्या यात्रेचे भाडे 2500 रुपये आहे. या फ्लाईट्स एअर इंडियाच्या क्षेत्रीय युनिट अलायंस एअर ऑपरेट करतील.
या योजनेतील विशेषता:
उड्डाण स्कीमच्या अंतर्गत सेवेत नसलेले 45 विमानतळांना एअर नेटवर्कमध्ये कनेक्ट केले गेले आहे.
लहान शहर टियर-2 आणि टियर-3 चे 13 विमानतळ, जेथे फ्लाईट्स नव्हत्या तिथे अधिक फ्लाईट्स उपलब्ध राहतील.
उड्डाण अंतर्गत 5 ऑपरेर्ट्स निवडण्यात आले आहे जे एअर इंडियाच्या सब्सिडियरी अलाइड सर्व्हिसेज, स्पाइसजेट, एअर डेक्कन, एअर ओडिशा टर्बो मेघा आहे.
सिव्हिल सेक्रेटरी आरएन चौबे यांनी सांगितले की प्रत्येक फ्लाईटमध्ये 50 टक्के सीट्स 500 किमी किंवा 2500 रूपयात एक तासाच्या भाड्यावर असतील.
 
कनेक्टिविटी
कानपूर ते दिल्ली ऑगस्टपासून
कानपूर ते वाराणसी आणि दिल्ली सप्टेंबरपासून
आग्रा ते दिल्ली
दिल्ली ते शिमला मेपासून
मप्र-छत्तिसगढामध्ये अंबिकापुर ते बिलासपुर आणि बिलासपुर ते रायपूर सप्टेंबरपासून
जगदलपुर ते रायपूर आणि विशाखापट्टणम सप्टेंबरपासून