1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 (09:49 IST)

दहा लाखांचे उत्पन्न असेल, तर एलपीजी सबसिडी बंद होणार

हैदराबाद- केंद्रीयमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी एनडीए सरकारकडून एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सबसिडी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सबसिडी हटवली जाणार आहे.
 
केंद्रीय शहरी विकास आणि संसदीय कार्यमंत्री नायडू यांनी म्हटले आहे, मला पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की, सरकारला अनेक अवैध गॅस कनेक्शन्सबद्दल माहिती झाली आहे. अशा ग्राहकांना दिला जाणारा गॅस थांबवून सरकार करोडो रुपये वाचवू शकणार आहेत.
 
दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍यांना सबसिडी देण्याची काय गरज आहे, मंत्र्यांना सबसिडीची काय गरज आहे. 
 
आतापर्यंत 30 लाख लोकांनी एलपीजीची सबसिडी सोडली आहे. ही सबसिडी गरीब लोकांना देण्याची गरज आहे, असे नायडू यांनी म्हटले आहे.