मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जानेवारी 2015 (16:03 IST)

अमृता खानविलकरचे शुभमंगल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर लग्नगाठीत अडकली आहे. या दोघांचा लग्नसोहळा दिल्लीत पार पडला आहे. मूळची मुंबईची असलेली अमृता आता दिल्लीची सून झाली आहे. दहा वर्षापूर्वी झी सिनेस्टार की खोज या शोमध्ये हिमांशू आणि अमृताची भेट झाली. भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आता प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले आहे.