बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (12:14 IST)

'हा अभिनय क्षेत्रातील खून', मालिकेतून काढल्यानं अभिनेत्याचा संताप

राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढल्याचा आरोप होतो आहे. याबाबत सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जातोय.
 
किरण माने हे चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते असून, ते सोशल मीडियावरून विविध चालू घडामोडींवर भाष्य करत असतात. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.
 
या प्रकाराला किरण माने यांनी 'झुंडशाही' म्हटलं आहे. ते म्हणतात, "मला जर न्याय मिळाला नाही, तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचं ते लोकांनी ठरवावं."
 
"माझ्या सगळ्या पोस्ट वाचा, त्यामुळे कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही," असंही किरण माने म्हणाले.