बिग बॉस मराठीच्या घरात तृप्ती देसाई, विशाल निकम, स्नेहा वाघ आणि इतर स्पर्धक कोण?

Bigg Boss Marathi
Last Modified सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (10:43 IST)
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे
अभिनेते आणि दिग्दर्सक महेश मांजरेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत.

बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये यंदा मनोरंजन क्षेत्रातील किती कलाकार सहभागी होणार आहेत, ते लवकरच स्पष्ट होईल. हे सगळे कलाकार 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील.

कोण आहेत स्पर्धक?
1. तृप्ती देसाई - तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आजवर अनेक धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत.
bigg boss trupti desai
2.सोनाली पाटील - कोल्हापूरच्या सोनाली पाटीलला टिकटॉकनं ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिनं वैजू नंबर वन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. देवमाणूस या मालिकेत तिने अँडव्होकेट आर्याची भूमिका साकारली होती.
3.विशाल निकम- अभिनेता विशाल निकमची बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री झालीये. साता जन्माच्या गाठी या मालिकेतून विशालला प्रसिद्धी मिळाली होती.
vishal nikam
4. स्नेहा वाघ- हिंदी आणि मराठी मालिकेतला प्रसिद्ध चेहरा असलेली स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरातली स्पर्धक आहे. स्नेहाने अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला या मराठी मालिकांमध्ये काम केलं होतं. तिने ज्योती, वीरा, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्य या हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
sneha wagh
5. मीरा जगन्नाथ- मीरानं मॉडेलिंगमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिनं माझ्या नवऱ्याचीची बायको या मालिकेत संजनाची भूमिका साकारली होती. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील मोमोच्या भूमिकेनं तिला लोकप्रियता मिळवून दिली.
mira jagannath
6. आविष्कार दारव्हेकर- मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आविष्कार दारव्हेकरनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. आविष्कारनं आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात या मालिकांमध्ये काम केलं आहे
7. डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे- गायक उत्कर्ष शिंदे हे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपैकी एक असतील.
utkarsh shinde
8. सुरेखा कुडची - अभिनेत्री आणि नृत्यांगना सुरेखा कुडची यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत बहुचर्चित 'मीना आत्या' ही त्यांची भूमिका गाजली होती.
9. गायत्री दातार- अभिनेत्री गायत्री दातार बिग बॉसच्या घरातली एक स्पर्धक असेल. तुला पाहते रे मालिकेतील गायत्रीची भूमिका गाजली होती.
gayitir datar


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

आर्यन खानला घरून मिळतेय इतकी मनीऑर्डर; अशी आहे त्याची ...

आर्यन खानला घरून मिळतेय इतकी मनीऑर्डर; अशी आहे त्याची कारागृहात स्थिती
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन ...

या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं

या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं
या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं

जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या ...

जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर
जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर

ड्रग्स केस: आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात ...

ड्रग्स केस: आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल
क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर ...

नोरा फतेही 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात ...

नोरा फतेही 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात पोहोचली
अभिनेत्री नोरा फतेहीला 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ...