गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

लातूर फिल्म फेस्टिवलची सुरुवात , ‘कासव’ अस्तु सारखे दर्जेदार चित्रपट पहायला मिळणार

सोसायटी फॉर वैलबिया अवेअरनेस अॅण्ड रिहमिलिटेशन (स्वर), अंतरंग व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय चित्रपट महोत्सवास येत्या शनिवारपासून लातूरात प्रारंभ होत आहे. शहरातील दयानंद सभागृहात शनिवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, जेष्ठ निर्माते व कलावंत मोहन आगाशे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थिति या चित्रपट महोत्सवास प्रारंभ होत आहे.
 
यानंतर मोहन आगाशे निर्मिती ‘कासव’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यानंतर एका चर्चासत्रात मोहन आगाशे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. याच दिवशी दुपारी ०३ वाजता ‘अस्तु’ हा चित्रपट दाखवण्यात येईल. रविवारी सकाळी ०९.१५ वाजता सभागृहातच श्रीमती सुमित्रा भावे व सुनील सुखटणकर दिग्दर्शित ‘बाधा’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. चित्रपटानंतर एका चर्चासत्रात सुमित्रा भावे व इतर कलावंत प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. दुपारी १२.३० वाजता लातूरचा अभिनेते रितेश देशमुख निर्मिती ‘यलो’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. यानंतर आयोजित चर्चासत्रात या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारे गौरी गाडगीळ व इतर कलावंत प्रेक्षकांशी संवाद साधतील. दोन दिवसीय चित्रपट महोत्सव विनामूल्य विनामूल्य असेल. मात्र नोंदणी व प्रवेशिका बंधनकारक आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी या संस्थेचे संस्थाध्यक्ष व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मिलिंद पोतदार, सचिव मुग्धा पोतदार अभिजात फिल्म सोसायटीचे जितेंद्र पाटील, श्याम जैन, धनंजय कुलकर्णी यांच्यासह स्वर, अंतरंग व अभिजात या संस्थेचे इतर पदाधिकारी गेल्या महिन्याभरापासून परिश्रम घेत आहेत.