कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी

kokan
Last Modified सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (16:06 IST)
कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही मागे नाहीत. या कठीण काळात कोकणवासीयांच्या मदतीला अनेक नावाजलेले कलाकार पुढे येत असतानाच दोन नवोदित कलाकारही त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. 'हरिओम' या आगामी मराठी चित्रपटात हरी आणि ओमची भूमिका साकारणारे हरिओम घाडगे आणि गौरव कदम पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले असून सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते मदत करत आहेत. दोन आयशर टेम्पो भरून संसार उपयोगी साहित्य त्यांनी जमा केले आहे. पोलादपूर, महाड, चिपळूण व कोल्हापूरमधील पूरग्रस्तांची हरिओम घाडगे व गौरव कदम यांनी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देत, सर्वतोपरी मदत केली.
कांदिवली आणि मालाड पश्चिम मधील भूमी पार्क, न्यू म्हाडा टॉवर, अस्मिता ज्योती को. हौ. सोसायटी, जनकल्याण नगर, म्हाडा, येथे मदतफेरी काढून सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गहू, गव्हाचे पीठ, तांदूळ,डाळीं, किराणामाल, औषधे, पाणी बॉटल, मेणबत्या, कपडे, अंथरूण-पांघरूणचे कपडे इत्यादी संसार उपयोगी साहित्याच्या रूपाने पूरग्रस्तांनसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
अशा या कठीण प्रसंगी नवोदित कलाकार सामाजिक भान जपत मदतीसाठी पुढे सरसावतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह' चित्रीकरणाचा श्रीगणेशा

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह' चित्रीकरणाचा श्रीगणेशा
हळूहळू आता सर्वत्र सुरळीत होत असतानाच सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक ...

लीला पासवानचा शोध सुरु. कोण आहे ती?

लीला पासवानचा शोध सुरु. कोण आहे ती?
सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम'च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि ...

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'

LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'
असे म्हणतात, 'लग्न पहावे करून'. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी ...

शमिता शेट्टीने जीजा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारल्यावर ...

शमिता शेट्टीने जीजा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारल्यावर आईने तीन शब्दात उत्तर दिले
आजकाल शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहे. शमिता शेट्टी आपला खेळ ...

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नंतर आता मनी लाँड्रिंगमध्ये अडकणार

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नंतर आता मनी लाँड्रिंगमध्ये अडकणार
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याऐजवी वाढत ...