अमेरिकेत निर्मित पहिला मराठी चित्रपट 9 जुलै रोजी कोल्हापूर येथे प्रदर्शित होणार

Theater
Last Modified गुरूवार, 7 जुलै 2022 (07:59 IST)
कोल्हापुरातील आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे वास्तव्य असलेल्या गौतम दिलीप पंगू यांनी आपला सांगलीचा मित्र आशय जावडेकर याच्या साथीने अमेरिकेत पहिला मराठी चित्रपट निर्माण करून नवा इतिहास घडवला आहे. 2019 मध्ये बनलेल्या या ‘डी. एन. ए.’ नावाच्या चित्रपटाचे प्रदर्शन कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी शनिवार 9 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी गौतम पंगू हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर शहरातील ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेच्या पिछाडीस असणाऱया पंगूवाडय़ात लहानाचा मोठा झालेला गौतम दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेला होताच.
लहानपणापासून लेखनाचा छंद जपणाऱ्या गौतम पंगू यांनी संशोधन कार्यात नावलौकिक कमवत असतानाही विविध प्रकारचे मराठी लेखन करणे सुरू ठेवले आहे. विशेषतः परदेशात स्थलांतरित भारतीयांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू ते आपल्या लेखनातून सातत्याने हाताळत असतात.
महाराष्ट्रातील आणि अमेरिकेतीलही विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ललित लेख, माहितीपर लेख आणि कथा सातत्याने प्रकाशित होत असतात. ‘स्टोरी टेल’ या ऑडिओ बुकसाठीदेखील त्यांनी काही कथा लिहिलेल्या आहेत. गौतम व आशय जावडेकर यांची भेट झाल्यानंतर त्या दोघांनी ‘शँक्स’ हा लघुपट व ‘डी. एन. ए.’ हा चित्रपट यांच्या पटकथा परस्परसहकार्याने लिहिल्या आणि आशय जावडेकरांनी या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेषतः ‘डी. एन. ए.’ला परदेशातील विविध महोत्सवात चांगली दाद मिळाली आहे आणि आता हा चित्रपट फिल्म सोसायटीमुळे कोल्हापुरातील रसिकांनाही पाहता येणार आहे.
फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी ‘डी. एन. ए.’ या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, पालकत्व म्हणजे डी. एन. ए. म्हणजेच केवळ गुणसूत्रे पुढच्या पिढीकडे केवळ संक्रमित करणे नव्हे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

साबुदाणा चालतो

साबुदाणा चालतो
आई: अरे श्यामू ,आज उपवास आहे मी तुला साबुदाने आणायला सांगितले होते आणलेस का? श्यामू : ...

"मी श्रावणात घेत नाही"

देशपांडे साहेब रोज एका बार मध्ये जातात आणि तीन ग्लास बिअर मागवतात. आणि त्या तीनही ग्लास ...

Happy Birthday Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar: ...

Happy Birthday Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar:  सचिन ‘नवरी मिळे नवऱ्याला’च्या सेटवर जमली जोडी, आज दोघांचा वाढदिवस
Happy Birthday Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar: मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ...

Ankita Lokhande Pregnancy अंकिता लोखंडे होणार आहे आई! ...

Ankita Lokhande Pregnancy अंकिता लोखंडे होणार आहे आई! पतीसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसतयं बेबी बंप
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंकिता सोशल मीडियावर खूप ...

फूल तोडण्यास मनाई आहे

फूल तोडण्यास मनाई आहे
आई: बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं. तू तर पूर्ण फांदीच ...