1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (08:43 IST)

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकाराने निधन

Veteran actor Raja Bapat passed away  Marathi Cinema News In Marathi
मराठी रंगभूमी , चित्रपट ,टीव्ही मालिकांतील ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. 
राजा बापट यांनी थोरली जाऊ, बाळा गाऊ कशी मी अंगाई, एकटी, नवरे सगळे गाढव, जावई विकत घेणे आहे. या गाजलेल्या मराठी चित्रपटात काम केले. या शिवाय त्यांनी जन्मदाता, हमीदाबाईची कोठी, शाकुंतल,पप्पा सांगा कोणाचे या नाटकात काम केले आहे. अग्निहोत्र, मनस्विनी, सखी, बे दुणे सहा या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या घरात आणि मनात स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे. 
 
Edited By- Priya Dixit