1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , शनिवार, 27 जून 2015 (11:58 IST)

अफ्रिदीने केली धोणीची पाठराखण

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने महेंद्रसिंह धोनीची पाठराखण केली असून बांग्लादेशमधील एका पराभवाने धोनीवर होत असलेली टीका थांबली पाहिजे, असे तो म्हणाला.

तो म्हणाला, बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर धोनीसोबत जो व्यवहार होत आहे, ते पाहून मला वाईट वाटले. एखादा वाईट पराभव आपल्या आवडत्या खेळाडूला खलनायक बनवून जातो, ही भारतीय उपखंडातील परंपरा संपायला हवी. याआधी देशाला या व्यक्तीने किती सन्मान मिळवून दिला, हे विसरू नका, असेही तो म्हणाला.