1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: कटक , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2008 (09:50 IST)

इंग्‍लंड संघाचा वन डे खेळण्‍यास नकार

मुंबईत झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर इंग्‍लंड संघाने भारतासोबतच्या एकदिवशीय मालिकेतील गुवाहाटी पुढील सामने खेळण्‍यास नकार दिला असल्‍याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भात इंग्‍लीश संघाने बीसीसीआयला एका पत्राद्वारे स्‍पष्‍ट नकार दिला आहे.

ब्रिटीश संघाचा पुढील सामना गुवाहाटी येथे होणार होता. मात्र मुंबईतील स्‍फोट आणि हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर इंग्‍लंडच्‍या संघाने खेळण्‍यास नकार दिला आहे. इंग्‍लंड संघाने आता घरी परतण्‍याचा पवित्रा घेतला आहे.