बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|

श्रीलंकेला हरवत ऑस्ट्रेलिया विश्वविजयी

गेले 48 दिवस सुरू असलेला क्रिकेटचा महाकुंभात अखेर ऑस्ट्रेलियाने बाजी मारत विश्वविजेते पदाचा किताब सलग तिसर्‍यांदा जिंकण्याचा विक्रम केला. येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रलियाने श्रीलंकेचा 53 धावांनी पराभव केला. सामनावीराचा पुरस्कार 149 धावा करणार्‍या अॅडम गिलक्रिस्ट मिळाला तर मालिकेचा मानकरी ग्लेन मॅकग्रा ठरला त्याने या विश्वचषकात विक्रमी 26 बळी घेतले.

पावसामुळे हा सामना 38 षटकांचा करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पोंटींगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सलामिवीर अॅडम गिलक्रिस्त(149) व मॅथ्यू हेडनने धडाकेबाज सुरूवात केली.(38) त्यांनी पहिल्या गड्यासाठी 172 धावांची भागिदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 38 षटकात 281 धावांचा डोंगर रचला. या आवाहनापुडे श्रीलंका 36 षटकात 8 बाद 215 धावा करू शकल्या.

श्रीलंकेची सुरूवात खराब झाली सलामिवीर उपल तरंगा मात्र 6 धावांवर बाद झाला. त्याला नॅथल ब्रेकनने बाद केले. त्यानंतर मात्र जयसूर्या(63) व कुमार संघकारा(54) यांची जोडी जमली व त्यानी दुसर्‍या गड्यासाठी 115 धावांची भागिदारी केली. ही जोडी फोडण्यात ब्रॅड हॉगला यश आले त्याने संघकाराचा बाद केले त्यानंतर जयसूर्याही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले.

पावसाने पुन्हा व्यत्यय आणल्यामुळे श्रीलंकेला 36 षटकात 269 धावांचे आवाहन देण्यात आले. मात्र त्यांना 215 धावांपर्यंतच मजल मारता आली.