शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सचिनच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतरचा गुडघ्याचा फोटो सचिनने फेसबुकवर शेअर केला आहे.
 
‘काही दुखापती निवृत्तीनंतरही छळत राहतात. मला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी मी लवकरच पुनरागमन करेन, गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून मी सध्या आराम करतोय’ अशी माहिती सचिनने फेसबुकवर दिली आहे. सचिनच्या फोटोवर सहाशेच्यावर शेअर्स आले असून सचिनच्या हजारो फॅन्सनी त्याला आराम करण्याची विनंती केली आहे.