गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

सचिन 34 वर्षांचा झाला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आज 34 वर्षांचा झाला.त्याने आपला वाढदिवस कुटुंब व जवळच्या मित्रांबरोबर साजरा केला.

विश्वचषकात खराब कामगिरीमुळे देशभरात त्याच्यासह सर्व क्रिकेटपटूंवर देशभर टिका होत आहे. आगामी बांग्लादेश दोर्‍यासाठी टीम इंडीयाची घोषणा करण्यात आली. त्यात सचिनसह माजी कर्णधार सोरभ गांगुलीलाही एकदिवसीय सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली.

आत्ताचा सचिनमध्ये पूर्वीचा दम राहिला नाही, त्यामुळे त्याने निवृत्त व्हावे असेही टिका सध्या देशभरातून होत आहे. वय पाठिचे दुखणे गुडघा व कोपर्‍याची दुखापतीने त्याला सतावले आहे. त्यामुळे त्याला फटके मारण्यावर बंधने आली आहेत.

तरी सध्याची आकडेवारी बघीतली तर वन डे व कसोटी अशा क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात सचिन अजूनही जागतिक दर्जाचा फलंदाज आहे हे सिध्द होते.