1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 12 जून 2014 (16:32 IST)

सर्वाधिक कमाई करणारांच्या यादी महेंद्रसिंह धोनी

क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम प्रस्तापित करणारा एमएस धोनी अर्थात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे नाव जागातील सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूंच्या यादीत झळकले आहे. सर्वाधिक कमाई करणार्‍या पहिल्या शंभर खेळाडूंना या यादीत स्थान देण्‍यात आले आहे.

'फोर्ब्स'ने जाहीर केलेल्या यादीत भारतीय क्रिकेट संघातील केवळ महेंद्रसिंह धोनीचे नाव झळकले आहे.

अमेरिकन मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर याने यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. वरच्या क्रमांकांवर गोल्फपटू टायगर वूड्स आणि टेनिसपटू रॉजर फेडरर व राफेल नदाल यांचाही समावेश आहे.

धोनीची तीन कोटी अमेरिकन डॉलर्सची एकूण कमाई आणि दोन कोटी 60 लाख डॉलर्सच्या जाहिराती यांसह या यादीमध्ये धोनीचे नाव 22 व्या क्रमांकावर आहे.