शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

बीसीसीआयला होणार 20 हजार डॉलर्सचा दंड

नवी दिल्ली- पुण्यातील खेळपट्टी खराब असल्याचे सिद्ध झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 20 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या दंडाला सामोरे जाण्याचा धोका असेल असे संकेत प्राप्त झाले आहेत. माजी फिरकीपटू शने वॉर्नने तर पुण्याची खेळपट्टी मंगळाच्या पृष्ठभागासारखी आहे, अशी खरमरीत टीका केली असून यामुळे बीसीसीआयचे आयसीसीला उत्तर काय असेल, याची प्रतीक्षा असणार आहे.
 
सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी पुण्यातील खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल दिला असून याला उत्तर देण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला 14 दिवसांची मुदत दिली आहे.