Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्ज आणि रवींद्र जडेजा यांच्यातील ब्रेकअप निश्चित, मे पासून फ्रेंचायझीच्या संपर्कात नाही
चेन्नई सुपर किंग्ज आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यात सध्या सर्व काही ठीक नाही. येत्या काही महिन्यांत दोघे वेगळे होऊ शकतात. भारतीय अष्टपैलू खेळाडू मे महिन्यात आयपीएल संपल्यापासून CSK व्यवस्थापनाच्या संपर्कात नाही. चेन्नई संघ खेळाडूंना एका कुटुंबाप्रमाणे ठेवतो आणि वर्षभर त्यांच्या संपर्कात राहतो, परंतु राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेत गुंतलेल्या जडेजाने फ्रँचायझीपासून अंतर ठेवले आहे. तो CSK च्या कोणत्याही मोहिमेत सहभागी होत नाहीये.
नेतृत्वाच्या ओझ्याचा त्याच्या खेळावर परिणाम होत असल्याचे व्यवस्थापनाला वाटले तेव्हा आयपीएलच्या मध्यात जडेजाला कर्णधारपदावरून वगळण्यात आले.
चेन्नईत कर्णधारपदी यश मिळवल्यानंतर जडेजा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहत होता. धोनीला त्याच्या जागी पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. यामुळे जडेजा नाराज झाल्याचे बोलले जात आहे.जडेजाने चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व सोशल मीडिया पोस्ट काढून टाकल्या. तो एकमेव खेळाडू होता जो चेन्नईने कर्णधार धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलेल्या व्हिडिओचा भाग नव्हता.
धोनीने आधीच सांगितले आहे की तो पुढील आयपीएल खेळणार आहे आणि बहुधा संघाचे नेतृत्व करेल. त्यामुळे जडेजा पुनरागमनासाठी तयार होण्याची शक्यता कमी आहे.