IND vs SA U-19 World Cup:भारताची विजयाने सुरुवात, दक्षिण आफ्रिकेवर 45 धावांनी विजय
2022 च्या अंडर-19 विश्वचषकाची सुरुवात भारताने विजयाने केली. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 46.5 षटकात 232 धावा करत सर्वबाद झाला.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 45.4 षटकांत 187 धावांत आटोपला .. कर्णधार यश धुल आणि फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. धुलने 82 धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर विकीने चांगली गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 232 धावा केल्या होत्या . अवघ्या 11 धावांवर भारतीय संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर शेख रशीद आणि कर्णधार यश धुल यांनी डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली.
रशीद 54 चेंडूत 31 धावा काढून बाद झाला. येथून यशने निशांत सिंधू, राज बावा आणि कौशल तांबे यांच्यासोबत छोट्या पण महत्त्वाच्या भागीदारी केल्या आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. मात्र, कर्णधार यशच्या रनआऊटनंतर संपूर्ण संघ 46.5 षटकांत 232 धावांवर आटोपली.
39व्या षटकात फिरकीपटू विकी ओस्तवालने दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के दिले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने मिकी कोपलँडला क्लीन बोल्ड केले. त्याला एक धाव करता आली. यानंतर शेवटच्या चेंडूवर केडेन सोलोमन्सही क्लीन बोल्ड झाला. सोलोमन्स शून्यावर बाद झाला.
या सामन्यातील विकीची ही पाचवी विकेट होती.
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत एका डावात पाच विकेट घेणारा तो सातवा गोलंदाज ठरला आहे