बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 6 जून 2020 (13:47 IST)

’आयपीएल' भारताबाहेर?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कोणत्याही परिस्थितीत यंदा इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) आयोजन करण्यासाठी आग्रही आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतरही देशात ही स्पर्धा आयोजित करण्यात अडचणी निर्माण होत असल्यास ‘बीसीसीआय' ही स्पर्धा भारताबाहेर खेळवण्याचा शेवटचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.
 
‘आयपीएल' भारतातच खेळवण्याला ‘बीसीसीआय'ची पसंती आहे. मात्र भारतात ही स्पर्धा घेणे शक्य नसल्यास, ती देशाबाहेरही खेळवण्याला ‘बीसीसीआ'ची तयारी आहे. ‘सध्या बीसीसीआय' सर्व पर्याय पडताळून पाहत आहे.
 
‘आयपीएल' भारताबाहेर खेळवायची असेल तर तो आमच्यासाठी शेवटचा पर्याय  असेल. जर हा शेवटचा पर्याय असेल तर आम्ही त्यावर नक्कीच विचार करू. आम्ही याआधीही ‘आयपीएल'चे आयोजन भारताबाहेर केले असून गरज पडल्यास यापुढेही त्याबाबतचे पाऊल उचलले जाईल, असे ‘बीसीसीआय'च्या एका पदाधिकारने सांगितले.