शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (10:19 IST)

ऑलराउंडर Rahul Tewatia लग्नाच्या बंधनात अडकले, या क्रिकेटपटूंनी हजेरी लावली

राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया विवाहबंधनात अडकले. त्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राहुल तेतेवतियाच्या पत्नीचे नाव रिद्धी पन्नू आहे. दोघांनी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंट केली होती.
 
राहुल आणि रिद्धीच्या लग्नाला अनेक क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. टीम इंडियाचा यष्टिरक्षक ऋषभ पंत, नितीश राणा आणि युझवेंद्र चहल यांसारखे अनेक स्टार्स या जोडीचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. राहुल तेवतिया राजस्थान रॉयल्स संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. IPL-2020 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध सलग पाच चेंडूत पाच षटकार मारून तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
 
मूळचा हरियाणाचा राहणारा राहुल तेवतिया हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आणि डावखुरा स्फोटक फलंदाज आहे. 2013-14 रणजी ट्रॉफीमध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. राहुल तेवतियाची अलीकडची कामगिरी पाहता त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध 25 चेंडूत 46 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे हरियाणाला हा सामना 6 विकेटने जिंकता आला.
 
राहुल तेवतिया या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग होता. जरी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.