मध्यप्रदेश विरुद्ध रणजी फायनल : पहिल्या दिवसअखेर मुंबई 5 बाद 248,

Last Updated: गुरूवार, 23 जून 2022 (16:00 IST)
बेंगळूर : पृथ्वी शॉ (79 चेंडूत 47) व यशस्वी जैस्वाल (163 चेंडूत 78) यांनी 87 धावांची सलामी दिल्यानंतरही मुंबईला मध्यप्रदेशविरुद्ध रणजी चषक स्पर्धेतील अंतिम लढतीत पहिल्या दिवसअखेर 5 बाद 248 अशा माफक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. आपल्या 42 व्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी मुंबईला पहिल्या डावात 400 पेक्षा अधिक धावांचा टप्पा सर करण्यासाठी आता सर्फराज खान (नाबाद 40) व शम्स मुलानी (नाबाद 12) यांच्याकडून अपेक्षा असतील.

मध्यप्रदेशतर्फे डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने एका एण्डकडून 31 षटके गोलंदाजी करत 91 धावात 1 बळी घेतला. त्या तुलनेत सीमर गौरव यादव (23-5-68-0) बळी घेण्याच्या निकषावर कमनशिबी ठरला. गौरव यादवने मुंबईच्या फलंदाजांवर विशेषतः कर्णधार पृथ्वी शॉवर दडपण राखण्यात कमालीचे यश प्राप्त केले.
संक्षिप्त धावफलक

मुंबई पहिला डाव ः 90 षटकात 5 बाद 248 (यशस्वी जैस्वाल 163 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 78, पृथ्वी शॉ 79 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 47, सर्फराज खान 125 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 40, हार्दिक तमोरे 3 चौकारांसह 24, शम्स मुलानी नाबाद 12. अवांतर 3. सारांश जैन 17 षटकात 2-31, अनुभव अगरवाल 19 षटकात 2-56, कुमार कार्तिकेय 31 षटकात 1-91).


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्ज आणि रवींद्र जडेजा ...

Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्ज आणि रवींद्र जडेजा यांच्यातील ब्रेकअप निश्चित, मे पासून फ्रेंचायझीच्या संपर्कात नाही
चेन्नई सुपर किंग्ज आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यात सध्या सर्व काही ठीक नाही. ...

Sachin Tendulkar : 32 वर्षांपूर्वी.... या दिवशी 17 वर्षीय ...

Sachin Tendulkar : 32 वर्षांपूर्वी.... या दिवशी 17 वर्षीय सचिनने पहिले कसोटी शतक झळकावून पराक्रम केले
आज 14 ऑगस्ट हा दिवस भारतीय क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरसाठी खूप खास आहे. 1990 मध्ये या दिवशी ...

Asia Cup: शाहीन आफ्रिदी आशिया कपमधून बाहेर पडू ...

Asia Cup:  शाहीन आफ्रिदी आशिया कपमधून बाहेर पडू शकतो,भारताविरुद्धचा सामना कठीण- सलमान बट
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गेल्या आठवड्यात आशिया कप टी-२० स्पर्धेसाठी संघाची ...

India vs Zimbabwe: व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा भारतीय ...

India vs Zimbabwe:  व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये प्रशिक्षकाची भूमिका ...

RCBचे यूट्यूब अकाउंट हॅक

RCBचे  यूट्यूब अकाउंट हॅक
नवी दिल्ली. विराट कोहलीने सजलेल्या आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर हल्ला झाला ...