शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 28 मार्च 2020 (11:53 IST)

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी

भारताचा माजी कर्णधार आणि सर्वांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी मीडियावर चांगलीच संतापली आहे.
 
तिने ट्वीट करुन सर्वांना विनंती केली आहे की कृपा करुन अशा संवेदनशील काळात तरी खोट्या बातम्या देणे थांबवा. लाज वाटायला पाहिजे…जबाबदार पत्रकारिता कुठे गायब झाली आहे काय काळत नाही.
 
घडलं तरी काय? 
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात करोना व्हायरसविरोधातील लढाईमध्ये मदत म्हणून धोनीने पुण्यातील 100 कुटुंबांसाठी केवळ एक लाख रुपये दान केल्याचं वृत्त पसरत आहे. या पोस्टवरुन लोकांनी राग व्यक्त केला आहे की वर्षाला 800 कोटी रुपये कमावणारा धोनी मदत म्हणून केवळ एक लाख रुपये देतो.
 
खरं तर एका रिपोर्टनुसार पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन नावाच्या एनजीओद्वारे 100 कुटुंबांच्या मदतीसाठी साडे बारा लाख रुपये जमा करत असताना एक लाख कमी पडल्यामुळे क्राउडफंडिंग वेबसाइट केटोच्या माध्यमातून धोनीने एक लाख रुपये देऊन केवळ ती रक्कम पूर्ण केली.