पाकिस्तान विरुद्धची मॅच आणि कर्णधारपदाबाबत काय म्हणाला विराट?

virat rohit
Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (22:18 IST)
भारत पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात मैदानावर भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास असल्याचं भारतीय कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं आहे.
रविवारी 24 ऑक्टोबरला भारताचा टी20 विश्वचषकातला पहिला सामना पाकिस्तानच्या विरुद्ध आहे.

"आम्ही टीमबाबत चर्चा केली आहे. मात्र मी त्याबाबत आत्ताच सांगणार नाही. आम्ही अत्यंत संतुलित असा संघ तयार केला आहे. संघातील सदस्य गेल्या काही दिवसांत आयपीएलमध्ये खूप टी-20 क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळं आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे," असं विराटनं म्हटलं.
"प्रत्येक जण चांगली कामगिरी करत आहे, ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. आता सर्वकाही सामन्यात मैदानावर आमची कामगिरी कशी असेल, त्यावर अवलंबून आहे. सगळ्याकडूनच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सर्वांना जबाबदारीची जाणीवही आहे."
5 फलंदाज, 1 यष्टीरक्षक, 3 फिरकीपटू, 3 अष्टपैलू आणि 3 गोलंदाज अशी संतुलित रचना असलेला संघ निवडसमितीने विश्वचषकासाठी निवडला आहे. विश्वचषकात के.एल. राहुल आणि रोहित शर्मा सलामीला येतील असं कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान सांगितलं होतं.

कर्णधार पद सोडण्याबाबत काय म्हणाला?
कर्णधार म्हणून कोहलीची ही अखेरची टी-20 स्पर्धा आहे. आयपीएलदरम्यान त्यानं वर्ल्ड टी-20 नंतर कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती.
कर्णधार पद सोडण्याचं कारण विराटला विचारण्यात आलं. त्यावर त्यानं याबाबत बोलण्यास नकार दिल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. वाद निर्माण करणाऱ्यांना संधी द्यायची नसल्याचं विराट म्हणाला.

"मी आधीच खूप स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळं यावर अधिक बोलायला हवं, असं मला वाटत नाही," असं तो म्हणाला.

सध्या वर्ल्ड टी-20 मध्ये चांगली कामगिरी करण्यावर लक्ष असल्याचं विराटनं सांगितलं.
" ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीतच त्या उकरून काढण्याचा लोक प्रयत्न करतात. मात्र मी त्यांना संधी देणाऱ्यांपैकी नाही."

"मी माझ्याबाबत अत्यंत प्रामाणिकपणे बोललो आहे. तरी लोकांना याबाबत अजून काही बोलायला हवं असं वाटत असेल, तर त्यांच्याबाबत मला वाईट वाटतं," असं त्यानं म्हटलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावत कर्णधारपद दिमाखात सुपूर्द करण्याची संधी कोहलीकडे आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

थोडक्यात बचावले शेन वॉर्न बाईक चालवत असताना अपघात झाला, ...

थोडक्यात बचावले शेन वॉर्न बाईक चालवत असताना अपघात झाला, मुलगाही जखमी
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा बाईक चालवताना अपघात झाला आहे. त्यामुळे ते जबर ...

शार्दुल ठाकूरचा साखरपुडा झाला, फोटो-व्हिडिओ आले समोर

शार्दुल ठाकूरचा साखरपुडा झाला, फोटो-व्हिडिओ आले समोर
भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने एंगेजमेंट केली आहे. मुंबईहून आलेल्या या खेळाडूचा ...

IND vs NZ 1st Test: चवथ्या दिवशीचा खेळ संपला, शेवटच्या ...

IND vs NZ 1st Test: चवथ्या दिवशीचा खेळ  संपला, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 280 धावांची गरज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा चौथा दिवस संपला. भारताच्या 284 धावांच्या ...

IND vs NZ: श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचला, ...

IND vs NZ: श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचला, पदार्पणाच्या सामन्यात शतक आणि अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी ...

IND vs NZ:पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकवणाऱ्या श्रेयस अय्यर ...

IND vs NZ:पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकवणाऱ्या श्रेयस अय्यर ने , एमएस धोनीचे वैशिष्टये सांगितले
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये ...