शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By राकेश रासकर|
Last Modified: दुबई , शनिवार, 2 जून 2007 (23:10 IST)

आयसीसी अध्यक्ष सोन यांचे निधन

काही दिवसांपासून आजारी असलेला अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष पर्सी सोन यांचे आज केप टाऊन येथे निधन झाले. त्यांचे वय 57 होते.

सोन यांच्या मोठ्या आतड्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला होता म्हणून मागच्या सोमवारी त्यांना केप टाऊनमधील ड्युबॅनव्हिल रूग्णालयात भरती करण्यात आले होते.

दक्षिण अफ्रिका क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले सोन यांनी जून 2006 मध्ये एहसान मनी यांच्याकडून आयसीसी अध्यक्षाचा कार्यभार संभाळला होता. त्यांचा कार्यकाळ 2008 मध्ये संपणार होता. मात्र काही कारणाने तो 2009 पर्यंत वाढवण्यात आला होता.