गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

सेल्फीच्या शौकिनने लावले लांब हात

सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर चढलेले आहे. स्मार्टफोन मिळताच जो तो सेल्फी काढत फिरत आहे. जपानमधील मनसून यांना असाच सेल्फीचा शौक जडला आहे. या सेल्फीच्या नादात त्यांनी असा एक कारनामा केला आहे की, तो पाहून प्रत्येकजण नवल करत आहे.
 
चांगल्या प्रकारचा सेल्फी काढण्यासाठी सेल्फी स्टीकची आवश्यकता असते. परंतु मनसून यांनी सेल्फी स्टीक वापरण्याऐवजी आपले हातच स्टीकसारखे लांब करून घेतले आहेत. मनसूनला पाहून वरवर असेच वाटेल. पण वास्तविक पाहता मनसून यांनी आपले हात लांब केले नसून हाताच्या आकाराची दिसणारी सेल्फी स्टीक बनवून घेतली आहे. 
 
या सेल्फी स्टीकला पाहणारी कोणतीही व्यक्ती हैराण होईल. मनसून यांचे म्हणणे आहे की, त्यांना लोकांच्या गराडय़ात असताना सेल्फी स्टीकने सेल्फी काढणे विचित्र वाटते. त्यामुळे त्यांनी हातासारखी दिसणारी सेल्फी स्टीक बनवून घेतली आहे. या सेल्फी स्टीकला हात बसवलेला असल्याने ती बसवताना मोठय़ा अथवा पूर्ण बाह्या असलेला शर्ट घालावा लागतो. मनसून यांनी सध्या तरी ही लांब स्टीक असलेला हात स्वत:साठीच बनवून घेतला आहे.